
राजाराम पूल ते खडकवासलादरम्यान महापालिका हद्दीतील भागाला ‘जीबीएस’ बाधित क्षेत्र म्हणून घोषित.
गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णांवरील उपचारांसाठी तसेच ‘जीबीएस’ प्रतिबंधासाठी महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी नांदोशी नांदेड धायरी या गावांत अधिक रुग्ण सापडत असल्याने राजाराम पूल ते खडकवासलादरम्यान महापालिका हद्दीतील भागाला ‘जीबीएस’ बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
आता शहरातील चार ‘न्यूरोलॉजिस्ट’नी पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. एका डॉक्टरने कामही सुरू केले आहे.