
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागात 7 नव्या लालपरी.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रत्नागिरी विभागाला 7 नव्या बस मिळाल्या आहेत. सध्या या बस टीआरपी येथील कार्यशाळेत ठेवण्यात आल्या आहेत. सर्व सातही बस दापाेली आगारात पाठविण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नवीन बसना स्वयंचलित दरवाजे तसेच आरामदायी आसने असल्याने प्रवास अधिक सुखकर हाेणार आहे.
मागील काही वर्षापासून एसटी रत्नागिरी विभागाला पुरेशा प्रमाणात नवीन बस न आल्याने कालबाह्य झालेल्या बस वापरात ठेवण्यात आल्या हाेत्या. रत्नागिरी विभागाकडे एकूण 720 बस असून 200 नवीन गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रीक बस देखील रत्नागिरी विभागाला देण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे.www.konkantoday.com