
टेरव येथील काेळसाभट्टी प्रकरणी शाेध माेहिमेत ना सापडला काेळसा, ना भट्ट्या.
वनविभागाने कारवाई करूनही धगधगणाèया काेळसा भट्ट्या आणि ग्रामस्थांनी दिलेला आंदाेलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या चिपळूण, सावर्डे, गुहागर येथील वनविभागाच्या कर्मचाèयांच्या पथकाने तक्रारदारांच्या उपस्थितीत टेरवच्या जंगलात शाेधमाेहीम राबवली. मात्र यामध्ये काेळसा भट्ट्यांसंदर्भात काहीही सापडलेले नाही. परिणामी तक्रारदार ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनाचे उपाेषण स्थगित केले आहे.टेरव येथील काेळसाभट्टी प्रकरणी तक्रारीनंतर वनविभागाकडून कारवाई करताना तीन भट्ट्या उध्वस्त केल्या.
काेळसा पाेतीसह काही ठिकाणी लाकूड साठाही जप्त केला. त्याचबराेबर भट्ट्या लावणाèया चाैघा स्थानिकांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र कारवाईनंतरही भट्ट्या धगधगण्याचे प्रमाण कायम असल्याचे सांगत ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनापासून काेल्हापूर आणि चिपळुणात आमरण उपाेषणाचा इशारा दिला हाेता.www.konkantoday.com