
शेतकर्यांच्या अन्नपदार्थांना योग्य बाजार मिळण्यासाठी फळ पिकाच्या खरेदी-विक्रीसाठी सात सामंजस्य करार
शेतकर्यांनी उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांना योग्य बाजार मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेंतर्गत एकूण ७ सामंजस्य करार झाले आहेत. यात प्रामुख्याने काजू खरेदीचे व्यवहार आहेत.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएम) व बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अमंलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्गामार्फत रत्नागिरी येथील कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत १२ खरेदीदार ४० प्रक्रियाधारक व स्मार्ट प्रकल्पांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मान्यताप्राप्त समुदाय आधारित संस्थांनी सहभाग नोंदवला.www.konkantoday.com