
शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे अणसुरे खाडीतील उत्खनन करोडो रुपयांचा महसूल बुडीत.
अणसुरे खाडीतील कच उत्खननामुळे येथील जैवविविधता व सामाजिक जीवन धोक्यात आले असतानाच गेली पंधरा वर्षे या विरोधात राजापूर तहसिलदारांसह जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यांना निवेदने देवूनही सर्वच अधिकार्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवत शासनाचा शेकडो रुपयांचा महसूल बुडवला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी अधिकार्यांनीच शासनाला चुना लावला असल्याचे आपण न्याय कुणाकडे मागणार, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारण्यात येत आहे.www.konkantoday.com