आता मासळी, सुपारी, बांबूवर करणार कर आकारणी; राज्यातील ‘या’ बाजार समितीचा निर्णय
कृषी उत्पन्न बाजार समितीचा सातत्याने वाढणारा तोटा लक्षात घेत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती दि. १५ जानेवारीपासून मासळी, सुपारी, बांबूवरील सेस नियमानुसार आकारण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाने घेतला आहे.*रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी जिल्ह्याचे खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांची भेट घेऊन बाजार समितीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली आहे.
.बाजार समितीला मिळणारा मार्केट सेस हाच बाजार समितीच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मासळी व्यावसायिक, खैर, सुपारी, काजू बी, बांबू, जळाऊ लाकूड व्यावसायिकांनी बाजार समितीच्या तपासणी नाक्यावर मार्केट सेस भरून सहकार्य करावे, असे आवाहन सभापती सुरेश सावंत यांनी केले आहे.