नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर लावल्यास आंदोलन छेडणार.
नागरिकांना सविस्तर माहिती न देता अदानी समूहाने स्मार्ट मीटर बदलल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा लांजा महावितरण उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी मविआच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदोष नादुरूस्त विद्युत मीटर बदलण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून अदानी समूहाने लांजा तालुक्यातील विद्युत मीटर जोडणीस सुरूवात केली आहे. भविष्यात या बाबतीतील फायदे-तोटे या बाबत जनसामान्यांना काहीच माहिती न देता हे स्मार्ट मीटर बदलण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेवीदारांनी आजतागायत १२ विद्युत मीटर बदलले आहेत.
या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महावितरण महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांना जाब विचारला तसेच यापुढे जोपर्यंत महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जनसामान्यांना याबाबत सविस्तर माहिती देत नाहीत, तोपर्यंत अदानी समूहाने कुठेही स्मार्ट मीटर जोडणी करू नये आणि सदोष मीटर बदलायचे असतील तर ते महावितरणचे आजतागायत चालत आलेले मीटर वापरावे. असे न झाल्यास महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.www.konkantoday.com