
वाहक चालकांच्या सतर्कतेमुळे एसटीत पडलेले पैशाचे पाकीट सापडले
कर्तव्यदक्ष एसटी कर्मचाऱ्यांचे प्रवाशांकडून कौतुक
रत्नागिरी. तुळजापूर गुहागर या लांब पल्ल्याच्या बस मध्ये एका वृद्ध महिलेच्या पैशाचे पडलेले पाकीट चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेला परत मिळाले. या कर्तव्यदक्ष वाहक आणि चालकांचे प्रवाशांतून कौतुक केले जात आहे. त्याचे घडले असे, महाराष्ट्र राज्यातील गुहागर आगाराची बस तुळजापूर गुहागर शुभ सकाळच्या दरम्यान तुळजापूरहून गुहापूर या मार्गावर प्रवास करीत होती.
यावेळी या मार्गावरती एक वृद्ध महिला कराड या ठिकाणी येण्यासाठी बसली होती. बस मध्ये भयंकर गर्दी होती. ही बस तुळजापूर गुहागर मार्गावर कराडच्या जवळपास आल्यानंतर आपल्या जवळील पैशाचे पाकीट बस मध्ये कुठेतरी पडल्याचे त्या वृद्ध महिलेच्या लक्षात आले.त्या पाकिटामध्ये प्रवासासाठी असणारे पैसे ठेवलेले होते. ते पाकीटच पडलेले पुढील प्रवास कसा करायचा या विचारातील महिला चिंताग्रस्त झाली. की बाप बस मधील सुज्ञ प्रवाशांनी वाहक आणि चालकांच्या निदर्शनास आणून दिली. कर्तव्यदक्ष वाहक आर.एस. देवकते आर. जे. शीलवंत यांनी कराड बस स्थानकात बस पोहोचतात. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये ठेवून पडलेल्या अर्थात गहाळ झालेल्या पैशाच्या पाकिटाची पाहणी केली.
प्रवाशांच्याकडेही विचारणा केली. प्रवाशांना कुणालाही सापडले नसल्याचे सांगितल्यानंतर बस मध्ये शोधा शोध सुरू केली. यावेळी वाहक आणि काही प्रवाशांना ते पैशाचे पाकीट बस मध्येच पडली असल्याचे निदर्शनास आले. ते पैशाचे पाते वाहक आणि चालकांनी संबंधित महिलेस सुपूर्द केले. पैशाचे पाकीट परत मिळाल्यामुळे त्यामुळे महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पैशाचे पाकीट परत मिळाले हे जरी सत्य असले आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असले तरी कर्तव्यदक्ष वाहक आणि चालकांकडून प्रामाणिक सेवेमुळेच आणि कर्तव्यदक्षपणामुळेच हे पाकीट मिळाल्याची चर्चा कराड बस स्थानक परिसरात बराच वेळ होती.
तुळजापूर बगल बस मध्ये पैसे असणारे सापडलेले पाकीट बस मध्ये पडले होते. ते एसटीचे गुहागर आगाराचे वाहक देवकते यांच्यामुळेच संबंधित महिलेचा प्रवाशांनीही वाहक देवकते यांचे मनभुमी कौतुक केले.
गुहागर आगाराचे वाहक देवकते हे तुळजापूर गुहागर या बस मध्ये सेवा बजावत असताना त्या वृद्द महिलेचे पैशाचे पाकीट आपल्या कर्तव्यक्षपणामुळेच मिळाले. अभिनंदन आणि तिरंगा रक्षक चा आपल्या कार्यास सलाम….