
लाडकी बहिण योजना लवकरच बंद पडणार, माजी खासदार विनायक राऊत यांचे भाकीत.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. परंतु ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा, माजी खासदार आणि शिव़सेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. रविवारी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी येथे आले असता विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लाडकी बहिण योजना विधानसभा निवडणुकीसाठी जुमला असून ती लवकरच बंद होणार, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता.
निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार, असेही विरोधक म्हणत होते तर आम्ही सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्तादेखील जमा होत आहे. मात्र ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी ही योजना बंद होणार असल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले आहे.www.konkantoday.com