
आरोग्य विभागातील बोगस औषधांची एसआयटी चौकशी-मंत्री हसन मुश्रीफ.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात विशाल एंटरप्रायजेस या कंपनीने बोगस औषध पुरवठा केल्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीऔषध पुरवठा शासन करत नाही. त्यासाठी हाफकीन संस्था निर्माण केली. मात्र त्यांच्याकडून औषध पुरवठा होत नसल्याने प्राधिकरण निर्माण केले आहे. औषधाची खरेदी सेंटरला होत नाही. हाफकीन आणि प्राधिकरण औषध खरेदी करत होते. वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाचा निधी अधिष्ठाता यांच्याकडे दिला आहे.
आता अधिष्ठाता आणि जिल्हा नियोजनचे अधिकार जिल्हाधिकारी यांना खरेदीचे अधिकार दिले आहेत.राज्यात नांदेड, नागपूर, धाराशिव, बीड, भिवंडी, अंबेजागाई, वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयांत तर कोल्हापूर, सिंधूदुर्ग येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बनावट औषधांचा साठा सापडला आहे. ही औषधे कोल्हापूर येथील विशाल एंटरप्राईजेसकडून पुरविण्यात आली आहेत.