
राजापूर तालुक्यातील खरवतेत योद्ध्याच्या वेषभूषेतील कातळशिल्प सापडले.
राजापूर तालुक्यातील खरवते येथील सड्यावर मानवी देहाची ठेवण असलेली आणि हाती तलवार घेवून योद्ध्याची वेशभूषा परिधान केलेली मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा, अशी दोन कातळशिल्प सापडली आहेत. ही सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळात कोरलेली आहेत. त्यामुळे खरवतेच्या सडा परिसरातील मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा दृष्टिक्षेपात आल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील बारसू, देवाचे गोठणे, देवीहसोळ आदी भागांतील सड्यांवर मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प गेल्या काही वर्षात आढळली होती. त्यानंतर खरवतेत प्रथमच दिसलेल्या या कातळशिल्पांमुळे पुन्हा एकदा राजापुरचे नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.www.konkantoday.com