चिपळुणात चौकडी कडून एकाची लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 98 लाखांची फसवणूक.

चिपळुणातील एकाची चार आरोपींनी कट रचून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून व लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 98 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिवाय यापुढे लग्नाचा हट्ट केलास तर अतिप्रसंगाची पोलिसांत तक्रार करीन, अशीही धमकी त्याला दिली.या प्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार, तीन महिला व विश्वनाथ अर्जुन नलावडे (सध्या रा. कळंबोली, ता. पनवेल, मूळ रा. पालवण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना दि. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सावर्डे परिसरात घडली. या प्रकरणी प्रसाद रमेश पाकळे यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन महिला व विश्वनाथ अर्जुन नलावडे यांनी कट रचून तब्बल 98 लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सावर्डे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तीन महिलांपैकी एकीने प्रमोद पाकळे यांच्याशी जवळीक साधली व त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये घेतले. चारही आरोपींनी संगनमताने कट रचून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली तसेच त्यांनी 98 लाख 18 हजार रूपयांची रक्कम घेतली.

त्यातील पहिल्या महिलेने पुन्हा लग्नाचा हट्ट धरू नकोस. तुझ्यावर पोलिसांत केस दाखल करेन, आता आमच्याकडे येऊ नको, अशी धमकी दिली. इतकेच नाही तर सर्वांनी शिवीगाळ करून, तुला संपवून टाकू, असेही धमकावले. या प्रकरणी तीन महिला व एकाविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाकळे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button