रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने डेरवणमध्ये क्रॉसकंट्री जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी.

रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने रविवार २२ रोजी क्रॉस कंट्री जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन डेरवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा संघ अमरावती येथे होणार्‍या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.स्पर्धा एसव्हिजेसीटी क्रीडा संकुल डेरवण, चिपळूण येथे २२ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

सर्व खेळाडूंनी ८.०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धा पुरूष व महिला (१० कि.मी.) २० वर्षाखालील मुले (८ कि.मी.) व मुली (६ कि.मी) १८ वर्षाखालील मुले (६ कि.मी.) व मुली (४ कि.मी.) मुली (२ कि.मी.) या गटात आयोजित करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button