
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य महोत्सवात ७०,१२५ रूपयांचा महसूल.
रत्नागिरी शहरात झालेल्या २३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेला ५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावत या स्पर्धेचा आस्वाद घेतला. प्रेक्षकांच्या प्रतिसादाने ७० हजार १२५ रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत पडला. यावर्षी या स्पर्धेत नाट्यसंस्थांची संख्या कमी झाल्याची खंत येथील रंगकर्मींकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे घेण्यात येणार्या उत्सवी नाटकांच्या महोत्सवातील नाटकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेने दिली आहे.www.konkantoday.com