श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या सचिवपदी डॉ. श्रीकर परदेशी यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
2001 च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले श्रीकर परदेशी हे जून 2021 मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते. त्यावेळी त्यांनी सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सांभाळली होती. 2022 मध्ये महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा ते फडणवीस यांच्या सचिवपदी कार्यरत होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.