राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; थंडी पळाली.
मुंबई:-राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचे संकट देखील राज्यावर घोंगावत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यातील घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचे संकट देखील राज्यावर घोंगावत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धारशिव काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. त्यामुळे कडक्याची थंडी पाडण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
उत्तर भारतातील हवामान पुन्हा एकदा बिघडणार आहे. मैदानी आणि डोंगराळ भागासाठी ८ डिसेंबरला नवीन पश्चिमी विक्षोभ दाखल होणार असून, त्यामुळे हवामानात बदल होणार आहे. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.