कोकण रेल्वे मार्गावरील करमळी ते वेरणा स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक.
कोकण रेल्वे मार्गावरील करमळी ते वेरणा स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ७ आणि ८ डिसेंबरला या मार्गावर झुआरी पुलाचे बांधकाम होणार आहे.यावेळी काही रेल्वे गाड्यांसाठी पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी (ता. ७) सायंकाळी ४ ते ६ यावेळात गाडी क्र. १२२१८ चंदीगड ते तिरुवअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस करमळी स्थानकावर ४५ मिनिटांसाठी नियमित केली जाईल. तसेच रविवारी (ता. ८) सकाळी ८.४५ ते १०.४५ वाजता नागपूर ते मडगाव क्र.०११३९ ही गाडी करमळी स्थानकापूर्वी एक तासानंतर नियमित केली जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.