
एसटी महामंडळाचा तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव.
राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीने नागरिकांना अनेक मोठी-मोठी आश्वासने दिली होती. दरम्यान, ही आश्वासने पूर्ण होणार का? हे पाहणे महत्त्वाचे असले तरी नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.एसटी महामंडाळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार, 14.13 टक्के वाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना सध्या 100 रुपयांच्या तिकिटावर 15 रुपये जादा मोजावे लागतील. सुरुवातीला परिवहन विभागाने 12.36 टक्क्यांची किरकोळ वाढ सुचवली होती, मात्र नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून ही वाढ 14.13 टक्के करण्यात आली.एसटीला दररोज होतोय कोट्यावधींचा तोटाराज्य सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई-पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे.
याआधी 2021 साली शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे.मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला दररोज 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास आणि एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचे, म्हटले जातेय.