मुंबई विद्यापिठाच्या युवा महोत्सवात देवरुखच्या डी-कॅडच्या विद्यार्थ्यांचे यश.
देवरूख शहरातील डी-कॅड कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत फाईन आर्ट या कला प्रकारात १ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य पदके मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली.तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने दिल्ली येथे पोस्टर मेकींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतातील कला महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते व त्यातून चित्राची निवड केली.यावर्षी डी कॅड कला महाविद्यालयाचा चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी टेनझिंन ओल्डन याच्या चित्राची निवड झाली. त्याला व प्रा. पोटफोडे यांना दिल्ली येथे आमंत्रित केले होते.पनवेल गुरूकुल कला निकेतन आयोजित राज्यातील निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत डी कॅड महाविद्यालयाचा विद्यार्थी साई दीपक सनगरे याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अजय पित्रे, ट्रस्टी भरती पित्रे, सेक्रेटरी वीरकर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.www.konkantoday.com