ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे ईव्हीएम च्या विरोधात उपोषण सुरू.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे EVM विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.पवारांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. दोघांमधील चर्चे दरम्यान, बाबा आढाव यांनी सरकारला विरोधक नकोच आहेत, असं वक्तव्य केलं. तर आढाव यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आल्याचा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचं पवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी ईव्हीएम वर संशय देखील व्यक्त केला.यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना , “काही उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे भरले आहेत. त्यामुळे मजमोजणी दरम्यान काही मतं सेट केल्याचा दावा केला जात आहे. यावर तुमचा विश्वास आहे का?” असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “लोकांमध्ये अशी चर्चा आहे, पण सध्या माझ्या हातात त्याचा काही पुरावा नाही.