१ लाख २१ हजार ३५६ ग्राहकांनी २८ कोटी ८८ लाख महावितरण कंपनीचे वीज बिल थकवले.
१ लाख २१ हजार ३५६ ग्राहकांनी महावितरणचे २८ कोटी ८८ लाख थकवले आहेत. त्यात शासकीय देणी अधिक आहेत. महावितरण कंपनीने समज, नोटिसा देऊनही ग्राहक थकबाकी भरत नसल्यामुळे कंपनी वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आली आहे. कठोर पावले उचलत ७१४ थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करत त्यांची वीजजोडणी तोडली आहे. त्यांची २६ लाख ४० हजार थकबाकी आहे.
महावितरण कंपनीचे आर्थिक वर्ष मार्च ते मार्च असे आहे; परंतु कोरोना महामारीनंतर वाढलेली थकबाकी महावितरण कंपनीने वसूल केली; परंतु मार्च २०२४ पासूनची थकबाकी वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील महावितरणचे ६ लाख १८ हजार ९१६ ग्राहक आहेत. १ लाख २१ हजार ३५६ ग्राहकांनी २८ कोटी ८८ लाख महावितरण कंपनीचे वीज बिल थकवले आहे.थकबाकी वसुलीसाठी कंपनीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु ग्राहक त्यालाही जुमानत नसल्याने कंपनीने वीजजोडणी तोडण्याची कठोर पावले उचलली आहेत. चिपळूण विभाग १८६ ग्राहकांची वीजजोडणी तोडली आहे. त्याची ६ लाख ९१ हजार थकीत आहेत.खेड विभाग २२३ ग्राहकांचे जोडण्या तोडल्या असून, त्यांची ८ लाख २४ हजार थकबाकी आहे, तर रत्नागिरी विभाग ३०५ ग्राहकांची जोडणी तोडण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ लाख २५ हजार येणे बाकी आहे. एकूण ७१४ ग्राहकांवर कारवाई करून त्यांची जोडणी तोडली आहे.
२६ लाख ४० हजार त्यांची थकबाकी आहे.जिल्ह्यातील वाणिज्य १ लाख ३ हजार २२० ग्राहकांकडून १० कोटी २० लाख थकबाकी आहे. घरगुती १० हजार ७६९ ग्राहकांकडून ३ कोटी ३२ लाख थकीत आहेत. ८६८ औद्योगिक १ कोटी १८ लाख, कृषी विभागाच्या १४६ ग्राहकांकडून १८ लाख तसेच शासकीय योजना व इतर सुमारे १५ कोटींची थकबाकी आहे.