
रत्नागिरी जिल्ह्यात ३५० मच्छिमारी नौकांना ट्रान्सपॉंडर बसवले.
मासेमारी नौकांना ट्रान्सपॉंडर्स बसवण्याच्या पहिल्या टप्प्यात ३५० संच बसवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याची मागणी १६०० संचांची असून टप्प्याटप्प्याने ते जिल्ह्यात दाखल होतील. मच्छिमारांना लाभदायक ठरणारी ही यंत्रणा १०० टक्के अनुदानावर केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी दिली.ते म्हणाले, जिल्ह्यात ३२९९ यांत्रिकी नौका आहेत. तथापि ज्या नौकांना केबिन आहे अशा नौकांसाठी ट्रान्सपॉंडर संच बसवणे शक्य होईल. अशा नौका जिल्ह्यात १९५० एवढ्या आहेत. त्यापैकी ३५० नौकांवर संच बसवून झाले. रत्नागिरी मच्छिमारांनी संच बसवण्याच्या कामी उत्तम सहकार्य केले. उपग्रहावर आधारित दळणवळण यंत्रणा या नौकांना उपलब्ध हाणार आहे. www.konkantoday.com