आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना- एकनाथ शिंदे यांचे आदेश.
विधानसभेचे मैदान मारताच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश दिले. मात्र सध्या महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून मुख्यमंत्रीपदावरच महायुतीची गाडी अडली आहे.देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे अशी सध्या राजकीय वर्तुळाता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, किमान अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, या मागणीवर शिंदे ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे. शपथविधी देखील 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंनी नवनिर्वाचीत आमदारांना पुन्हा आपल्या घरी जाण्याचे आदेश दिले आहे.सध्या एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार हे मुंबईतील हॉटेल ताज लँड्स बांद्रा येथे आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत जा आणि मतदारांचे आभार माना, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा… आपआपल्या घरी जा.. पुढचा निरोप येईपर्यंत मतदारसंघ सोडू नका…मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. शपथविधीची तारीख ठरली मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही . उद्या देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी नियुक्ती होणार आहे. महायुती उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपाल यांच्याकडून 29 तारखेला शपथविधीचे निमंत्रण जारी होईल. 5 तारखेपर्यंत महायुतीत कोणाला कोणते खाते दिले जाणार हे निश्चित केले जाईल त्यानुसार 5 डिसेंबरला 29 ते 30 आमदार कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील