
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे उड्डाण पुलाखालील जागेवर वाहनतळ, वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
सतत वाहनांच्या रेलचेलीसह पादचार्यांच्या वर्दळीने गजबजलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील उड्डाण पुलाखाली मोकळी जागा वाहनतळ बनली आहे. या मोकळ्या जागेत कुठेही अन कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहनचालकांसह पादचार्यांच्या मार्गात स्पीडब्रेकर निर्माण झाला आहे. सातत्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. याशिवाय अपघातांचा धोकाही कायम आहे.खेड तालुक्यातील भरणेतील मध्यवर्ती ठिकाण ऐनकेन कारणांनी समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी चारही बाजूने वाहनांची सतत रहदारी सुरू असते. पादचार्यांचीही तितकीच वर्दळ सुरू असते.
भरणे येथील उड्डाणपूलामुळे दोन्ही बाजूकडील धावणार्या वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आला असला तरी उड्डाण पुलाखालील भाग नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या ठिकाणच्या मोकळ्या जागेत कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. www.konkantoday.com