
जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षकांची चिपळूण मतमोजणी केंद्राला भेट
रत्नागिरी, दि.२२ – जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या समवेत आज २६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील पूर्वतयारीचा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
ईव्हीएम सुरक्षा कक्षाची पाहणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.