
प्रचार दौऱ्यासाठी येणाऱ्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी सुरू आदित्य ठाकरे व उदय सामंत यांच्या बॅगा तपासल्या.
सध्या निवडणुकाच्या काळात निवडणूक विभागाने प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी सुरू केली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टर मधून प्रचारासाठी गेले असता दोन वेळा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली त्यामुळे विरोधीकांनी टीका केली होती त्यानंतरही निवडणूक विभागाच्या पथकाने आपली कामगिरी सुरूच ठेवली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हेलिकॉप्टर मधून प्रचारासाठी आले असता निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सामानाची तपासणी केली काल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर मधील सामानांची तपासणी ही निवडणूक विभागाच्या पथकाने केली तसेच जयगड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टर मधील सामानाची तपासणी ही निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली त्यामुळे प्रचाराचा धुरळा संपेपर्यंत या तपासण्या सुरूच राहतील असा अंदाज आहे आता सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्याही तपासण्या होत असल्याने विरोधकांची विरोधाची धार कमी झाली आहे