भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवार 16 नोव्हेंबर रोजी कणकवली येथे जाहीर सभा
कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवार 16 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा दुपारी 1 वा. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील भाजपा कार्यालयासमोर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.यावेळी त्यांच्यासमवेत महायुतीचे उमेदवार नितेश राणे, भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. प्रभाकर सावंत म्हणाले, देवेंद्र फडणवीस 16 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात यापूर्वीभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे त्याचप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह भाजपा नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबविली आहे.