ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र.
सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे .
ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केलाय. नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचं कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाजबहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली आहे.