जिल्ह्यातील 85 वर्षापुढील 3583 आणि 592 दिव्यांग मतदारांचे होणार घरातून मतदान

रत्नागिरी, दि. 13 : जिल्ह्यामध्ये उद्या गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदार संघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील 85 वर्षापुढील 3 हजार 583 मतदार आणि 592 दिव्यांग मतदारांचे उद्यापासून घरातून मतदान होणार आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षापुढील गृह मतदानासाठी पात्र मतदार पुढीलप्रमाणे- 263 दापोली – 817, 264 गुहागर – 768, 265 चिपळूण- 724, 266 रत्नागिरी – 661 आणि 267 राजापूर – 613 अशी एकूण 3583 मतदार. विधानसभा मतदार संघनिहाय गृहमतदानासाठी पात्र दिव्यांग मतदार पुढीलप्रमाणे- 263 दापोली – 113, 264 गुहागर – 136, 265 चिपळूण- 111, 266 रत्नागिरी – 126 आणि 267 राजापूर – 106 अशी एकूण 592 इतके मतदार.. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button