सहकार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत, वीज कर्मचारी लाईनमनवर गुन्हा.

रत्नागिरी शहरालगतच्या निवखोल येथे विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी लाईनमनवर गुन्हा दाखल केला. ७ नोव्हेंबरला ही दुर्घटना घडली होती. रणजित देवळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाईनमनचे नाव आहे. कोणतीही सुरक्षा उपकरणे न देता पोलवर चढविल्याचा ठपका देवळे याच्यावर पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. कुंदन दिनेश शिंदे (२१, रा. फणसवळे, रत्नागिरी) असे मृत कंत्राटी कर्मचार्‍याचे नाव आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button