
समीक्षा शामदास चौधरी हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत कुमार केसरी स्पर्धा जिंकली.
खोर (ता. दौंड) सारख्या ग्रामीण दुष्काळी डोंगराळ भागातील समीक्षा शामदास चौधरी हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत कुमार केसरी स्पर्धा जिंकली. पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यावतीने औंध पुणे याठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चौधरी हिने ३५ किलो वजन गटामध्ये विजय संपादन करत मानाची चांदीची गदा मिळवली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रोहिणी देवबा (कोल्हापूर) हिला चितपट केले. पै. समीक्षा चौधरी ही वरवंड येथील श्री गोपीनाथ तालीम संघामध्ये प्रशिक्षणाचे धडे घेत आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने स्पर्धा प्रमुख म्हणून पै. नवनाथ घुले व प्रा. दिनेश गुंड यांनी कामकाज पाहिले. समीक्षाच्या विजयाचे शिल्पकार वस्ताद पै. महेश शितोळे, संजय वाघमोडे, पोलिस संदीप पवार, सागर चौधरी, प्रवीण दिवेकर, भाऊसाहेब काकडे, सचिन टेंगले, संदीप चौधरी, क्रीडा अधिकारी पै. मनीषा दिवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.