रत्नागिरी टिळक आळीत महायुतीची बैठक, उदय सामंत यांच्या विजयाचा संकल्प
रत्नागिरी, रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे महायुतीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या समर्थनार्थ मोठा उत्साह दिसून आला.बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकमत होऊन उदय सामंत यांना शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन, शैक्षणिक विकासासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या विकासकामांमुळे रत्नागिरी जिल्हा प्रगतीच्या मार्गावर असल्याचं सामंत म्हणाले. या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परूळेकर, भाजप समन्वयक सचिन वाहळकर, शिवसेना समन्वयक, सुधीर मयेकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेट्ये यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नागरिक उपस्थित होते.