महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले.त्यानंतर आता मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पुढील डीजीपी निवडीसाठी मुख्य सचिवांना 05 नोव्हेंबर 2024 (दुपारी 1.00 वाजता) पर्यंत वेळ देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.