आपचे बंडखोर उमेदवार ज्योतीप्रभा पाटील मागत आहेत जनतेचा कौल.
विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपचे प्रमुख ज्योतीप्रभा पाटील यांनी बंडखोर अर्ज दाखल केला आहे मात्र त्यांनी आता आपण निवडणूक लढवावी की नाही याबाबतचा कौल जनतेकडे मागितला आहे त्याबाबत त्यांनी व्हिडिओतून जनतेला आव्हान केले आहे त्यासाठी त्यांनी एक गुगलवर फॉर्म तयार केला असून तो लोकांनी भरून द्यावा की पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी की नाही मुळात रत्नागिरीत आपची ताकद अजिबात दिसत नाही त्यांचे मागे कार्यकर्तेही नाहीत त्यामुळे पाटील यांनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली यामुळे दोन महत्त्वाच्या उमेदवारांवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही मात्र पाटील हे कोणती भूमिका घेणार हे आज स्पष्ट होईल तरीदेखील पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेतील असा राजकीय अंदाज आहे