पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पनवेल येथील जाहीर सभेसाठी सचिन वहाळकर समन्वयक.
रत्नागिरी येथील भारतीय जनता पक्षाचे नेते सचिन वहाळकर यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ नोव्हेंबरच्या प्रस्तावित पनवेल जाहीर सभेसाठी कोकण समन्वयक म्हणून झाली आहे. या सभेसाठी समन्वयासाठी लागणारे काम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे ही सभा यशस्वी होईल, असा विश्वास सचिन वहाळकर यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे युती समन्वयक म्हणून यापूर्वीच पक्षाने नियुक्ती केली आहे.www.konkantoday.com