महाविकास आघाडीने मेगा प्री-पोल सर्व्हेत मारली बाजी! तब्बल ‘एवढ्या’ जागा मिळण्याची शक्यता!
राज्यात विधानसभा निवडणुककीही धामधूम सुरू आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या नंतर निवडणुक रिंगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडीसाठी चांगली बातमी आली आहे. ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने नुकताच एक सर्व्हे केला असून यात महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल १५७ जागा मिळण्याचा दावा करण्यात आलं आहे. तर महायुतीला केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.*राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत आहे. महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. ४ तारखे नंतर निवडणूक रिंगणाचे चित्रस्पष्ट होणार आहे.ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलने निवडणुकीचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत महाविकास आघाडीला भक्कम यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडीला तब्बल १५५ जागा तर महायुतीला केवळ ११७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या सर्व्हेत महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत फक्त २३ जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ १४ जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे, तर महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तर महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक ६८ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ४४ व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनाही ४ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे या सर्व्हेत पुढे आले आहे.या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार महाविकास आघाडीला एकूण १५७ जागा मिळणार आहे. तर, काँग्रेस ६८ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ४४, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ४१, सपा १, सीपीआय-एम १, व पीडब्ल्यूपीला ०२ जगा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला ११७ जागा मिळण्याची शक्यता असून यात सर्वाधिक ७९ जगा या भाजपला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २३ तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला १४व आरवायएसपी पक्षाला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर १४ अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.*मतमोजणी नंतर होणार चित्र*या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. या दिवशी या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.