दुचाकीस्वाराला धडक देणार्या ट्रकचालकावर गुन्हा.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील सातपायरी येथे दुचाकीस्वाराला धडक देणार्या ट्रकचालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना २७ ऑक्टोबर रोजी ८ च्या सुमारास घडली. राघवेंद्र गुरण्णा गुळदे (रा. कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. राघवेंद्र हा २७ ऑक्टोबर रोजी ट्रक (केए ३२ एए ४७२९) घेवून जयगड ते कर्नाटक असा जात होता. रात्री ८ च्या सुमारास समोरून येणार्या दुचाकीस्वाराला त्याच्या ताब्यातील ट्रकने धडक दिली. यात संकेत देमाजी कुळ्ये (रा. खालगाव, रत्नागिरी) हा जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com