रत्नागिरी जिल्ह्यातील २,६९६ उमेदवार देणार टीईटी परीक्षा.
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परिक्षा १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात या परीक्षेला २ हजार ६९६ इतके उमेदवार बसणार आहेत.राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) नोव्हेंबर २०२४ येत्या १० नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यात आयोजित केले जाणार आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षेला पेपर एकसाठी १ हजार ७७ तर पेपर दोनसाठी १ हजार ६१९ असे एकूण २ हजार ६९६ विद्यार्थी बसणार आहेत. या नियोजनासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम. कासार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते. www.konkantoday.com