मोफत गणवेश योजनेखाली विद्यार्थ्यांना मिळाला एकच गणवेश.
यावर्षी शासनाने एक राज्य एक गणवेश ही संकल्पना राबवताना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचे जाहीर केले आहे. मात्र शाळांना दिवाळीची सुट्टी सुरू होण्यास काही कालावधी असताना एक गणवेश देत विद्यार्थी व पालकांची बोळवण केली आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच दिवाळी सुट्टीपूर्वी काही दिवस एक गणवेशाचे विद्यार्थ्यांना वाटत करण्यात आले. मात्र बुटाचा अद्यापही पत्ता नाही.शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना गेल्या कित्येक वर्षापासून दोन मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्वी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसुचित जाती व जमातीची सर्व मुले, दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना लाभ मिळत होता. मात्र या धोरणामध्ये शासनाने बदल करताना आता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना दोन मोफत गणवेश शासनातर्फे दिले जात आहेत. गतवर्षी गणवेशाचे अधिकार स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले होते. त्यानुसार राज्याकडून प्रति विद्यार्थ्याला प्राप्त होत होता.हा निधी शिक्षण विभागाकडून त्या त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जात होता.www.konkantoday.com