पावस ते डोर्ले ही मुख्य वीज वाहिनी भूमिगत करावी-सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे.
पावस ते डोर्ले ही मुख्य वीज वाहिनी भूमिगत करण्याची मागणी डोर्लेतील सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहेजिल्ह्यातील किनारपट्टीलगत 200 मीटर वरील गावातून भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे हाच प्रकल्प पावस विभागात राबवावा व भूमिगत वीज वाहिन्या टाकून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प एकच्या यशस्वी पूर्ततेनंतर आता प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात चालू केला आहे त्याचा लाभ माझ्या पावस विभागातील सर्व गावांना व्हावा व अखंडित वीज पुरवठा मिळावा अशी मागणी संतोष पोकडे यांनी केली आहे