
परवाना न घेतलेल्या चिपळुणातील २५ फटाके विक्रेत्यांना पोलिसांच्या नोटीसा.
कोणतीही परवानगी न घेता शहर बाजारपेठेत फटाक्यांची विक्री करणार्या २५ फटाके विक्रेत्यांना चिपळूण पोलिसांनी रविवारी नोटीसा दिल्या आहेत. विक्रीची रितसर परवानगी घ्यावी, तसेच अनुचित प्रकार घडल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहराप्रमाणेच खेर्डी परिसरात रस्त्यालगत फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे फटाक्यांची दुकाने लावण्यापूर्वी त्याची नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. असे असताना सर्वच नियम धाब्यावर बसवून हे विक्रेते कोणतीच परवानगी न घेता रस्त्यालगतच फटाक्यांचे स्टॉल लावत असल्याचे आजवरचे समीकरण आहे. www.konkantoday.com