अखेर नाराज उदय बने यांनी अपक्ष म्हणून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अर्ज भरला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज भरला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता रत्नागिरी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवट चा दिवस होता. 4 नोव्हेंबर ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतरच या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल