कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांचा १ नोव्हेंबरपासून वेग वाढणार.
कोकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे. १० जूनपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांचा वेग मंदावला होता. यामुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागत होता. मात्र १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असून विलंबाच्या प्रवासातून प्रवाशांची सुटका होणार आहे.कोकण मार्गावर पावसाळ्यात उदभवणार्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गस्तीसाठी ६७५ रेल्वे कर्मचार्यांची कुमक तैनात केली होती. असुरक्षित ठिकाणी २४ तास जागता पहाराही ठेवण्यात आला होता. तीन ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आले होते. १० जूनपासून रोह्यापासून ठोकूरपर्यंत ताशी ७५ च्या वेगाने रेल्वेगाड्या धावत आहेत. वीर ते कणकवली ताशी ७५, कणकवली ते मडगाव ताशी ९०, मडगाव ते कुमठा ताशी ७५, कुमठ्यापासून उडीपीपर्यंत ताशी ९० वेग आहे.www.konkantoday.com