सरकारने महामंडळाला ३५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) आर्थिक संकटात असलेल्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने महामंडळाला ३५० कोटी रुपयांची अर्थसहाय्य मंजूर केली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.