
रत्नागिरीत चंपक मैदान येथे ट्रेनिं नर्स वर अत्याचाराचा प्रकार घडला नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट.
काही दिवसापूर्वी रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानावर ट्रेनी नर्स वर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे या प्रकरणावरून शहरात संतप्त वातावरण झाले होते शासकीय रुग्णालयातील नर्सनी रुग्णालयाबाहेर येऊन आंदोलन केले होते याशिवाय भाजप शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर शासकीय रुग्णालयाबाहेर आंदोलन करून रस्ता रोको केला होता मात्र या प्रकरणात आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे याप्रकरणी पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक देऊन याबाबत खुलासा केला आहे यामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की “चंपक मैदान” येथे युवतीवर “न झालेल्या” अत्याचाराबाबत खुलासा.दिनांक 26/08/2024 रोजी एका युवतीने तिच्यावर चंपक मैदान येथे अत्याचार झालेबाबतची रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली व या प्रमाणे लागलीच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 319/2024 बी.एन.एस. चे कलम 64 (1) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी लागलीच 4 पोलीस अधिकारी व 7 पोलीस अंमलदार यांचे एक “विशेष तपास पथक” गठित करुन तपास करण्याचे निर्देश दिले.दरम्यान या युवतीचे सिव्हील हॉस्पीटल, रत्नागिरी येथे गुन्ह्याचे अनुषंगाने पूर्ण वैद्यकीय तपासणी करून नमुने घेण्यात आले व न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर यांच्याकडे तपासणी करिता पाठविण्यात आले.या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 26 साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आली व जबाब नोंदविण्यात आले. रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले व त्या आधारे तपास करण्यात आला. तसेच या गुन्ह्याच्या अधिक तपासा करिता या युवतीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूसही करण्यात आली.न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर यांचे कडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी होऊन त्यांचा अभिप्राय अहवाल विशेष प्राधान्याने व तात्काळ प्राप्त व्हावा या अनुषंगाने प्रयोग शाळेचे उपसंचालक यांना पत्रव्यवहार व संपर्क करण्यात आला. दिनांक 18/10/2024 रोजी सदरचा अभिप्राय अहवाल प्राप्त झाला व या अहवालामध्ये युवतीने दिलेल्या फिर्यादी मधील हकिगतीला पुष्टि देणारी माहिती नमूद नाही.एकंदरीत झाले तपासा वरून, तांत्रिक पुराव्यांवरून, वैद्यकीय अहवालावरून, तसेच फिर्यादी युवतीला आरोग्यविषयक समस्या असल्याने, यातील फिर्यादी युवतीने केवळ तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले असावेत असा गैरसमज होऊन सदरची फिर्याद गैरसमजूतीने दिलेली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. व मा. न्यायालय, रत्नागिरी यांना याबाबत अहवाल सादर करण्यात आलेला आहे. असे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे