गुरांचा बंदोबस्त करा, अन्यथा नगर पालिकेत आणून बांधू-साजिद सरगुरोह.
चिपळूण शहरातील रस्त्यांवर मोकाट गाढवांसह उनाड जनावरांची संख्या देखिल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी नागरिकांच्या अंगावर धावून जाणे तर कधी वाहनांना त्यांची धडक बसून अपघात घडत आहेत. हे गंभीर प्रकार सातत्याने सुरू असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. शहरवासियांना होणार्या या त्रासाविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. मोकाट गाढवांसह जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा त्यांना पकडून चिपळूण नगर पालिकेत आणून बांधू असा गर्भीत इशारा जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकार्यांना दिला आहे.चिपळूण शहरात भटकी कुत्री, गाढवे आणि जनावरे यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. www.konkantoday.com