
मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्गावरील निवळी कोकजेवठार टोलनाक्याचे काम सुरू.
मुंबई-गोवा महामार्गावरील गेली अनेक वर्ष रखडलेल्या कांटे ते वाकेड या आठव्या टप्प्यातील कामाला आता वेग आला आहे. या टप्प्यात येणार्या निवळी कोकजेवठार येथील रूंदीकरणास सुरूवात झाली असून याच परिसरात टोलनाक्याचे कामही आता सुरू झाले आहे. मात्र या टप्प्यातील हातखंबा जंक्शनच्या आराखड्यासह अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने तळेकांटे ते वाकेड या आठव्या टप्प्यातील काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक वर्ष रखडलेले सातव्या व आठव्या टप्प्यातील काम हा चर्चेचा विषय बनत आहे. अनेकवेळा कंत्राटदार बदलूनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या सर्वच कामांचा तपशील केंद्र शासनाच्या रस्ते आणि परिवहन विभागाला सादर करण्यात आला. अहवालानुसार आरवली ते तळेकांटे या सातव्या टप्प्यातील काम रखडल्याबद्दल कंत्राटदारांना नोटीस काढण्यात आली आहे. www.konkantoday.com