दिवाळीच्या हंगामात कोकण मार्गावर धावणार्या दिवाळी स्पेशल हाऊसफुल्ल!
दिवाळी सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या चारही दिवाळी फेस्टिव्हल स्पेशलच्या ३२ फेर्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडली आहेत. नियमित एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाल्याने चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. दिवाळी सुट्टीसाठी जाहीर केलेली पहिली एलटीटी सावंतवाडी फेस्टिव्हल स्पेशल १८, तर अन्य ३ फेस्टिव्हल २२ ऑक्टोबरपासून धावणार आहेत.www.konkantoday.com