कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा निव्वळ नफा.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थापनेपासूनचा सर्वाधिक निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षांत मिळवला आहे. २०२३-२४ ला कॉर्पोरेशनला ४७०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३०१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती कोकण रेल्वेच्या ३४व्या स्थापनादिनाच्या सोहळ्यात कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.स्थापना दिवसाचा कार्यक्रम मडगाव येथील रवींद्र भवनात साजरा करण्यात आला. या सोहळ्यावेळी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा, संचालक राजेश भडंग, आर. के. हेगडे उपस्थित होते.या वेळी झा यांनी सांगितले, पेडणे व ओल्ड गोवा येथील बोगद्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. त्यात त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला १७ हजार ९५१ रुपयांचा सानुग्रह जाहीर केला आहे. कोकण रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक नफा ३०१ कोटी ७५ लाख कमावला आहे.