
दापोली तालुक्यातील डौली-गावठाणमध्ये पुलावरून कार कोसळली.
दापोली तालुक्यातील डौली गावठाण पुलावरून जाणारी पुणे येथील पर्यटकांची कार पुलावरून कोसळल्याची घटना नुकतीच घडली. यात पर्यटकांना किरकोळ दुखापती झाल्या. पुणे-पिंपरी चिंचवड येथून आलेले पर्यटक डौली येथे आले असताना गावठाण पुलाजवळ अरूंद रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी नदीत उलटली. नदीपात्र व पूल यातील भाग कमी खोल असल्याने पर्यटकांना फारशी दुखापत झाली नाही. पर्यटकांची कोसळलेली गाडी क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली. यासाठी सरपंच हरिश्चंद्र महाडिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत महाडीक, पोलीस पाटील रूपेश महाडीक, ग्रा.पं. कर्मचारी गणेश महाडीक, निळकंठ महाडीक, विनोद महाडीक यांसह ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. काही महिन्यापूर्वी पर्यटकांची बस याच नदीपात्रात कोसळली होती. तसेच दुचाकी व सायकलस्वार विद्यार्थ्यालाही अपघात झाला होता. येथील रस्ता अरूंद असल्याने पुलाचा थोडा भाग खचल्याने वारंवार अपघात होत आहेत. यावर्षी आतापर्यंत घडलेला हा चौथा अपघात आहे. www.konkantoday.com